नंदगिरी किल्ला

नांदेड जिल्ह्यात आज फक्त अवशेष शिल्लक असणारा नंदगिरी किल्ला होता. गोदावरी नदीच्या काठी हा किल्ला होता. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.

नंदगिरी किल्ला नांदेड शहरातील अरब गल्लीत आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खासगी बसगाड्या येतात. मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने जावे. नांदेडहून रिक्षाने या किल्ल्यापर्यंत जाता येते.

नांदेड शहरास ‘नंदीतट’, ‘नंदीनगर’, इ. नावांनाही ओळखतात. हे नगर नंद वंशातील राजाने वसवले होते. नांदेड हा नगर किल्ला होता. सातवाहनांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपीठ होते. वाकाटक, चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र म्हणुन प्रसिध्द होते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,581 वेळा पाहिलं