सौंदर्यवृद्धीस पोषक पदार्थ

जगातील प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने उत्पादने तुम्हाला काही क्षणांसाठी सुंदर आणि तरुण बनवतात, यात शंका नाही, परंतु त्यांचा दीर्घकाळ वापर त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो. खरे तर, सौंदर्य उत्पादने त्वचेवर कार्य करतात; परंतु वास्तविकता अशी आहे की त्वचा आतून तरुण आणि सुंदर बनवणे महत्वाचे आहे. हे काम ‘कोलेजन’ हा घटक करतो. कोलेजन हे प्रथिन आहे. शरीरातील 30 टक्के प्रथिने ही कोलेजनपासून बनलेली असतात.
कोलेजन त्वचा, स्नायू, हाडे आणि संयोजी ऊतींना आधार, ताकद आणि संरचना प्रदान करतात. जसजसे वय वाढत जाते, तसतसे शरीरातील ‘कोलेजन’ बनवण्याची शरीराची प्रवृत्तीही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे तुमच्या आहाराची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्वचेचे वृद्धत्व रोखण्यासाठी कोलेजनयुक्त गोष्टींचे सेवन केले पाहिजे. आहारात अश्वगंधाचा समावेश करावा. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे सेवन केल्याने वृद्धत्वाची लक्षणे टाळण्यास मदत होते.आवळा हा जीवनसत्व ‘सी’चा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे. आवळा शरीरातील कोलेजन पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतो. हे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते, ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे निर्माण होतात. त्वचेला उजळपणा देण्यासोबत, खराब झालेल्या त्वचेला चमकदेखील देते. असेच तुळशीमध्येही अनेक गुणधर्म आढळतात. तुळशीमध्ये मुक्त रॅडिकल्सशी लढण्याची ताकद आहे. याच्या सेवनाने त्वचेतील कोलेजन वाढते.तूपामध्ये जीवनसत्व ‘ए’, ‘डी’ आणि ‘ई’ मुबलक प्रमाणात असते, जे निरोगी त्वचेसाठी आवश्यक असते. जीवनसत्व ‘ए’ कोलेस्टेरॉलच्या उत्पादनास प्रोत्साहन देते, जे त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते. त्यात जीवनसत्त्वे असतात, जी वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात आणि अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करतात.