
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो.
मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो तुम्ही बिनदिक्कत ते खाऊ शकतात, तो म्हणजे ‘काळा तांदूळ’ ! ‘काळा तांदूळ’ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी आहे. एवढेच नाही तर काळ्या तांदळात प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आहारात भात आवडत असेल, तर तुम्ही काळा तांदूळ निवडू शकता. तो तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देणार नाही. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची देखील काळजी घेईल. काळा तांदूळ कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणूनच आहारात काळ्या तांदूळाचा नक्कीच समावेश करा. अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते. जर आपणास ही समस्या असेल, तर आजपासूनच काळ्या तांदूळाचे सेवन सुरू करा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पचनाशी संबंधित इतर समस्याही दूर होण्यास मदत होईल.