कांदावाली भेंडी

साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ.

कृती
भेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे जाडसर काप करा. गॅस चालू करा. एका भांड्यात तेल घ्या. तेल गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. थोडे परतून घ्या, नंतर भेंडी घाला. मध्यम आचेवर भेंडी झाकून ठेवा. अधूनमधून ढवळत रहा. भेंडी थोडी परतून झाल्यावर आणि शिजल्यावर त्यात कांदा घालून परता. झाकण ठेवून १ मिनिट शिजवा. गरजेनुसार आच मंद करा. आता त्यात हळद व मीठ टाका. झाकण काढून मध्यम आचेवर भाजून घ्या. भेंडी कुरकुरीत आणि लाल झाल्यावर गॅस बंद करा. ही ‘कांदा वाली भेंडी’ छान चवदार लागते.






18,324 वेळा पाहिलं