
हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे.
साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.
कृती
कढईत शिजवलेली लाल चवळी घ्या. त्यात कोहळा आणि भोपळ्याचे चौकोनी तुकडे घाला. यात वालाचे दाणे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे ढवळून त्यात थोडे पाणी घाला. भांडे झाकून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्या. झाकण काढा. हळुवार ढवळा. आता मीठ आणि कढीपत्ता घाला. थोडे ढवळा. यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा. थोडे तेल घाला. पुन्हा ढवळा. आस्वाद घेण्यासाठी ‘ओलन’ तयार आहे.