कांदा भजी

साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल.

कृती : कांदे उभे चिरून घ्यावेत. आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. त्यावर एक झाकण ठेवून 30 मिनिटे झाकून ठेवावेत. असे केल्याने कांद्याने सोडलेले पाणी बेसन आणि तांदळाच्या पिठात शोषले जाते. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सर्व मसाले घालून मिसळून घ्यावे. जर ते खूप कोरडे वाटत असेल, तर 2-3 चमचे पाणी घालावे. पीठ तयार आहे. तेल गरम करत ठेवावे. नंतर त्यात थोडे-थोडे मिश्रण घालून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. आता कांदा भजी तयार आहे. ती गरमागरम चहासोबत खाण्यास द्यावीत.






13,066 वेळा पाहिलं