राजस्थानी बटाट्याचे भरीत

साहित्य :
10 बटाटे, 1 लहान चमचा मीठ, 4 कांदे, 1 लहान चमचा लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा जिरे पावडर, 1 मूठभर कोथिंबीर पाने, २ चमचे मोहरीचे तेल, ४ हिरव्या मिरच्या

कृती:
सुरुवातीला सर्व वस्तू स्वच्छ धुवून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये पाणी घेऊन तो मध्यम आचेवर ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यात बटाटे घालून उकडण्यास ठेवा. आता कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
बटाटे उकडल्यावर ते पाण्यातून काढून घ्या. बटाटे थंड झाल्यावर साले काढून घ्या. एक भांडे घेऊन त्यात बटाटे ‘मॅश’ करुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, मोहरीचे तेल, लाल तिखट, जिरेपूड घालून छान मिसळून घ्या. रुचकर बटाट्याचे भरीत तयार आहे.






14,471 वेळा पाहिलं