साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल.

कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस बंद करावा. गार झाल्यावर एका भांड्यात दही घेऊन त्यात रवा भिजवावा. मीठ घालून १ तास झाकून ठेवावा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवावे. एका वाटीत तेल गरम करून त्यात १ लहान चमचा खाण्याचा सोडा घालून गरम करावे. हे रव्याच्या मिश्रणात घालून झटपट ढवळत रहावे. म्हणजे मिश्रण फुलून जाईल. आता हे मिश्रण पात्रामध्ये घालावे आणि नेहमीप्रमाणे इडल्या बनवाव्यात. इडली खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर वाढावी.






192 वेळा पाहिलं