साबुदाण्याची खीर

साहित्य : १ वाटी साबुदाणा, १ लिटर दूध, दीड कप साखर किंवा गूळ, ४ वेलची.

कृती : साबुदाणा शिजवण्यापूर्वी सुमारे 15 मिनिटे पाण्यात भिजवा. कढईत दूध उकळत ठेवा. एक उकळी आल्यावर त्यात साखर आणि वेलचीपूड घाला. यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालून सुमारे 5-10 मिनिटे उकळू द्या. याने साबुदाणा दूध शोषून घेईल आणि फुगेल. मग यात साधारण १ कप पाणी घालून एक उकळी आणा. चविष्ट साबुदाणा खीर तयार आहे.