सासवणे सागरकिनारा

महाराष्ट्राच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे या छोट्याशा गावात ‘सासवणे समुद्रकिनारा’ आहे. हा किनारा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते; मात्र तो निर्जनही नाही. आरामशीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा मस्त शांत किनारा आहे. अलिबाग शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर हा किनारा आहे. ‘करमरकर शिल्प संग्रहालय’ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. ही शिल्पे श्री. नानासाहेब करमरकर यांनी कोरलेली आहेत.

त्यांच्या वाड्यात ही शिल्पे पाहता येतात. सासवणे येथील श्री फुलाई माता मंदिरालाही आपण भेट देऊ शकता. याशिवाय सासवण्याला जवळ असणाऱ्या मांडवा बंदर आणि रेवस बंदर येथेही आपण भेट देऊ शकतात. सासवण्यापासून अंदाजे तास ते दीड तास अंतरावर असलेला रेवदंडा किल्ला, कोरलाई किल्ला, कनकेश्वर मंदिर इत्यादी प्रेक्षणीय स्थळेही आपल्याला पाहता येतील. डोळ्यांना आणि मनाला आनंद देणारा सासवणे किनारा फार सुंदर आहे. हा प्रशस्त किनारा सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.






272 वेळा पाहिलं