महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बस मिळतात. सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरून 1 किमी. चालत ‘सोनगीर’ गाठता येते. सोनगीरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.
किल्ल्याच्या पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. घरांच्या रांगांमध्ये बोळ आहेत. 8-10 मीटर चढल्यावर किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर ‘सुवर्णगिरी’ किल्ल्याचा कसाबसा तग धरून उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ लागतो. या दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम नाही. येथे पूर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेत ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. कबरीपासून 15-20 पायऱ्या चढून वर गेल्यावर गडमाथा लागतो. हा किल्ला लांबीने जास्त आहे.
इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पाहणी केली होती. या किल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची आहे. ती तटबंदीही मधूनमधून खाली ढासळलेली आहे. जमिनीखाली हौदासारख्या वास्तू बांधलेल्या आहेत. त्यामध्ये तेल आणि तूप साठवीत असल्याचे दिसते. त्यामुळे या जागांना ‘तेल टाके’ आणि ‘तूप टाके’ असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे, पण खोल टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरू नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे. या विहिरीतून खाली गावातही पाणीपुरवठा होत असे. या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा होत असते. शत्रूच्या हल्ल्यापासून पळून जाता यावे याकरिता या किल्ल्यात एक गुप्त भुयार तयार करण्यात आले होते. हे भुयार जवळ जवळ १७ किमी. लांब आहे.