चटपटीत सॅलड

साहित्य – 1 कप हरभरा, १ कप मूग, २ हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो

१ कांदा, 1 काकडी, अर्धा चिरलेला लिंबू, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा काळे मीठ. गरजेनुसार ओली कोथिंबीर.
कृती – सर्वप्रथम दोन पातेल्यांमध्ये पाणी घेऊन त्यात हरभरे आणि मूग वेगवेगळे घालून रात्रभर भिजत ठेवावेत . सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून गाळून घ्यावेत. त्यानंतर स्वच्छ सुती कापडात गुंडाळून एक किंवा दोन दिवस तसेच राहू द्यावे . ज्यादिवशी सॅलड बनवायचे आहे, त्यादिवशी टोमॅटो, कांदा, काकडी, हिरवी मिरची, ओली कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आता सर्व अंकुरलेले धान्य एकदा हळुवार धुवावे आणि चांगले गाळून घ्यावे. मग सर्व चिरलेल्या भाज्यांमध्ये ते मिसळावे. नंतर अर्ध्या लिंबाचा रस, काळे मीठ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिसळावे चटपटीत सॅलड तयार आहे.