स्टेपलपिन निर्मिती

कार्यालयीन कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो; परंतु बदलती जीवनशैली आणि सुशिक्षित लोकांच्या उपस्थितीमुळे आजकाल प्रत्येक घरात गरजेनुसार कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो. या कारणास्तव, या उत्पादित मालासाठी बाजारपेठ नेहमीच उपलब्ध असते. वर्षभर कमी भांडवलात हा उद्योग सुरू ठेवता येऊ शकतो. नवीन उद्योजकांनी बाजाराचा अभ्यास करून तोट्याची शक्यता नसलेला हा व्यवसाय निवडला पाहिजे. स्टेपलपिन वेगवेगळ्या धातूपासून बनवल्या जातात. या पिना तांबे किंवा स्टेनलेस स्टीलच्या तारांपासून बनवलेल्या असतात.
तांब्याच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या तारांपासून बनवलेल्या स्टेपलपिन यांना बाजारात चांगली मागणी आहे. स्टेपलपिन तयार करण्यासाठी स्टेपलपिन बनवणारी स्वयंचलित यंत्रसामग्री बहुतेक मोठ्या शहरांमध्ये यंत्रे विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. ज्या धातूपासून स्टेपलपिन तयार करायचे आहे, त्या धातूच्या वायरचे तुकडे स्वयंचलित यंत्रामध्ये टाकले जातात. तयार करायच्या स्टेपलपिनचा आकार स्वयंचलित मशीनवर निश्चित केला जातो. ठरलेल्या वेळेनुसार यंत्रात तारा पुढे सरकतात. तयार स्टेपल पिना यंत्राच्या ‘ग्लूइंग’ भागामध्ये पुढे सरकतात. तयार केलेल्या लहान तुकड्यांना तेथे गोंद लावला जातो, आणि तुकडे पॅकिंगसाठी तयार होतात.
स्टेपलर आणि स्टेपलपिना बहुधा सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये वापरल्या जातात. प्रत्येक कार्यालय आणि कार्यालयासाठी पिना आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे, सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये स्टेपलर आणि स्टेपलपिनाची आवश्यकता असते. एकाच संदर्भाशी संबंधित विविध कागदपत्रे एकत्र ठेवण्यासाठी कागदपत्रे स्टॅपल करून एकत्र ठेवली जातात. जर तुम्ही कागद फक्त साठवून ठेवलात तर पिन बाहेर येण्याची शक्यता असते. परंतु स्टेपल दाबल्यानंतर, पिना आपोआप लॉक होतात, त्यामुळे स्टेपलसह पिन केल्यावर कदाचित पेपर्स अव्यवस्थित होत नाहीत. त्याचप्रमाणे, स्टेपलर आणि पिना सर्वत्र वापरल्या जातात; कारण पिनिंग करणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे. एकदा स्टेपलर विकत घेतला की, तो पुन्हा-पुन्हा विकत न घेता वर्षानुवर्षे टिकतो. त्याला त्याच्या गरजेनुसारच पिना विकत घ्याव्या लागतात.
अशा स्टेपलर पिनच्या बॉक्सची किंमतही केवळ दहा ते पंधरा रुपयांपर्यंत असते. स्टेपल पिनचा वापर विविध कार्यालयांमध्ये केला जातो, परंतु कंपन्या, कारखाने, सर्व प्रकारच्या उद्योगांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनाही स्टेपल पिनची गरज असते. या कारणास्तव, सर्वच भागात स्टेपल पिनला चांगली मागणी असल्याने, तुम्ही हा व्यवसाय छोट्या जागेत सुरू केला, आणि स्वतः मार्केटिंग केले तर तुम्हाला दुप्पट नफा मिळू शकतो.
स्टेपलपिन बनविण्याचे प्रशिक्षण स्टेपलपिन यंत्रे विकणाऱ्या वितरकांद्वारे तसेच तत्सम यंत्रांच्या निर्मात्यांद्वारे दिले जाते. स्वयंचलित यंत्र असल्याने माल तयार करणे फारसे अवघड नाही. विक्री प्रतिनिधी किंवा यंत्र तंत्रज्ञ तुम्हाला पिन कशा तयार केल्या जातात याची माहिती देतात. अगदी थोडासा अनुभव घेऊनही तुम्ही उत्पादन कसे करायचे याचे ज्ञान मिळवू शकता. ज्यांना स्वतःचे विपणनाचे ज्ञान आहे, त्यांनी अशा उद्योगाच्या शोधात या व्यवसायाचा नक्कीच अभ्यास करावा.स्टेशनरी आणि कटलरीच्या व्यापाऱ्यांकडे स्टेपलपिनची सर्वाधिक विक्री होते. स्टेपल पिन विकणारे घाऊक विक्रेते आणि वितरक देखील आहेत. त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन त्यांच्या गरजेनुसार त्या आकाराचा माल आपण तयार करू शकतो. त्यासोबतच व्यापारी संस्था, दुकानदार, कार्यालये, कंपन्या, कारखाने, बँका या ठिकाणी थेट विक्रीसाठी येणार आहेत. विक्री प्रतिनिधी नियुक्त करून घरोघरी विपणन करु शकता. यासाठी स्टेनलेस स्टील कोटेड वायर, कॉपर वायर, ग्लू, पॉलिशिंग टेबल., पॅकेजिंगसाठी कच्चा माल म्हणून लहान बॉक्स इ. साहित्य आवश्यक असेल.