
आजच्या जगात दररोज ताजेतवाने दिसणे फार गरजेचे आहे. कार्यालय असो की घर, आप ले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजेतवाने दिसण्यासाठी चेहर्यावर ‘मेक-अप’ असायला हवा, असा आपला समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा.
जीवनशैलीतील अगदी साध्या बदलांनी आणि काही उपायांनी दररोज ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता.
रोज स्वच्छ आंघोळ करावी. नियमितपणे केस धुवावेत. चेहरा धुण्यासाठी चांगल्या फेसवॉशचा वापर करावा .
केसांची नीट काळजी घ्यावी. ‘मेक-अप’ करायचा असेल तर ‘लाइट’ आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करावा.
दिवसा ‘सनस्क्रीन’ लावूनच घराबाहेर पडावे. कोणताही हंगाम असला तरी ‘सनस्क्रीन’ टाळू नका.
ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे फळे आणि भाज्या खाव्यात. भरपूर पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील. तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल.
कायम हसत रहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचे प्रतिबिंब चेहर्यावर पडल्याशिवाय राहणार नाही.
रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. आपण कितीही महागडे उपाय केले, महागड्या ‘स्पा’मध्ये गेलात तरीही अपुर्या झोपेमुळे आपला चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.