सब्जा खा प्रसन्न रहा

रखरखीत उन्हाळ्यात शरीराला थंड पदार्थांची गरज असते. पोटाशी संबंधित काही समस्या यावेळी डोके वर काढतात. सब्जा हा उन्हाळ्यातील एक उत्तम उपाय आहे. आपली त्वचा उन्हाने रखरखीत झालेली असते. किरकोळ आजार आणि त्वचेवर होणारा परिणाम यामुळे माणूस वैतागून जातो. तो वैताग चेहऱ्यावर उमटतो. प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी या दिवसात सब्जा खावा.

सब्जाच्या बियांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सब्जा पचनासाठी फायदेशीर आहे. यातील थंड गुणधर्म पोटातील उष्णता कमी करतात.

त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल, तर प्रभावित भागावर सब्जाच्या बिया लावू शकता. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. सब्जाच्या बिया खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. केसांना सुंदर ठेवण्यासही ते मदत करते. त्यात प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

सब्जाचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. अतिखाण्यावर नियंत्रण ठेवता येते. उन्हाळ्याच्या दिवसात अपचनचा त्रास होत असल्यास आवर्जून दिवसभरात सब्जाचे सेवन करावे. या दिवसात, कमी पाणी पिण्यामुळे लघवीची समस्या उद्भवते. अशावेळी सब्जाचे पाणी नियमित सेवन केल्याने चांगला आराम मिळतो.







23,292