नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांची विक्रमी नोंद
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात नुकतीच पावसाळापूर्व पक्षी प्रगणना यशस्वीरित्या पार पडली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रामसर स्थळ असलेल्या या अभयारण्यात वन्यजीव विभागाने केलेल्या शास्त्रीय सर्वेक्षणात अभयारण्याची समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा समोर आली आहे. या विशेष मोहिमेत अभयारण्याच्या परिसरात हजारो स्थानिक आणि विविध प्रजातींच्या पक्ष्यांची यशस्वी नोंद करण्यात आली…