लंडनहून पंढरपूरकडे वारीचे प्रस्थान
आषाढी वारी सोहळा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. लंडनमधून विठ्ठलभक्तांची एक विशेष दिंडी विठूरायाच्या दर्शनासाठी रवाना झाली आहे. या अभूतपूर्व उपक्रमाला जागतिक वारी असे नाव देण्यात आले आहे. यामुळे वारकरी संप्रदायाचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. इंग्लंडमधील विंडसर परिसरातून भक्तीमय वातावरणात या अनोख्या दिंडीचे प्रस्थान झाले…