औट्रम घाट प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या औट्रम घाटातील प्रस्तावित जुळ्या बोगद्याचा भूगर्भीय तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गातील तांत्रिक आव्हान आता दूर झाले आहे. या शास्त्रीय तपासणीमध्ये बोगद्याच्या मार्गात कोणताही भूगर्भीय अडथळा किंवा भूपृष्ठाखालील जलसाठ्याचा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे….