कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा
कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात भर म्हणजे आता हवामान खात्याने अत्यंत तीव्र स्वरूपाचा लाल इशारा जाहीर केला आहे. विशेषतः शिवमोगा आणि चिक्कमगळुरू या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोडागू, हासन, बेळगावी, हावेरी आणि धारवाड…