राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा — २०२६ चा निकाल जाहीर केला असून मुख्य परीक्षेसाठी एकूण ४,१०३ उमेदवारांची निवड झाली आहे. ३१ मे रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल अवघ्या एका महिन्यात घोषित करण्यात आला. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १,८२८ उमेदवार पात्र ठरले आहेत….