नाशिकमध्ये पहिल्याच पावसात विकासकामांची कोंडी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या अवाढव्य विकासकामांचा आणि रस्ते खोदकामाचा फटका पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात नागरिकांना बसला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहराची दैना उडाली असून, विविध भागात रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पहिल्याच पावसाने महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाचे…