मुलांच्या त्वचेची काळजी घ्या

उन्हाळ्यात मुलांचे अंग घामामुळे थबथबलेले असते. बाहेरील उष्णता आणि अंगावरचा ओलेपणा त्वचेवर परिणाम करतो. यामुळे मुलांना अंगावर खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा तक्रारी सुरु होतात. त्यामुळे मुले चीडचीड करू लागतात. याकरिता मुलाला दिवसातून २ वेळा आंघोळ घालावी. त्यामुळे त्याचे शरीर थंड होईल. या दिवसात मुलांना सुती कपडे घालावेत. त्यामुळे अंगावरील पुरळाची समस्याही कमी होईल. मुलाच्या आंघोळीसाठी बेसन किंवा उटण्याचा वापर करावा.

घरातील खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. मुलांना कोंडत वातावरणात ठेवू नये. खोली हवेशीर असली पाहिजे. या दिवसात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. उष्णतेमध्ये शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान सहज नियंत्रित राहते. त्यामुळे मुलांना पाणी पिण्यास द्यावे. दिवसभरात मुले आवश्यक तेवढे पाणी पितात की नाही याकडे लक्ष ठेवावे.

या दिवसात मिळणारी फळे मुलांना खाण्यास द्यावीत. जास्त तिखट, अति तेलकट पदार्थ मुलांना देऊ नयेत. मुलांना नैसर्गिक पेये पिण्यास द्यावीत.







22,468