
ओठांचे फुटणे सामान्य आहे. अशा वेळी व्हॅसलीन किंवा लिप बाम वापरले जातात. काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास निश्चित चांगला परिणाम जाणवतो. हिवाळ्यात कोरडे वारे वाहत असतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते, ओठांनाही भेगा पडतात. ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते.
त्यामुळे या बदलत्या ऋतूमध्ये ओठांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा फाटलेले ओठ चेहऱ्याच्या सौंदर्यावर डाग पाडण्याचे काम करतात. शिवाय ते वेदनाही देतात. लिप बाम आणि व्हॅसलीन लावल्याने विशेष असा फायदा होत नाही. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ॲलर्जी किंवा चिडचिड होऊ शकते. कोरडेपणा आणखी वाढू शकतो.
हिवाळ्यात ओठ फुटण्याचा त्रास होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा. ५ मिनिटे ओठांना हलके मसाज करा. यामुळे संपूर्ण हिवाळ्यात आपले ओठ गुलाबी आणि मुलायम राहतील. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला उपाय आहे. जे लोक ओठ आणि त्वचेवर खोबरेल तेल लावतात, त्यांना कोरड्या ओठांची समस्या जाणवत नाही. दिवसातून २-३ वेळा ओठांवर खोबरेल तेल लावावे.
यामुळे ओठांच्या दुखण्यापासून आराम मिळेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना क्रीम लावून मसाज करावे. याने ओठ 2-3 दिवसात मऊ आणि कोमल होतील. ओठ फुटण्याची समस्या असणाऱ्यांनी मध वापरावे. यामुळे ओठ मऊ होतील. भेगा कमी होतील. हिवाळ्यात खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा वारंवार धुवू नये. जास्त रंग, वास किंवा अल्कोहोल असलेली उत्पादने वापरणे टाळावे. ओठांभोवतीची त्वचा स्वच्छ करावी. ओठांना व्यवस्थित मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम वापरावा.