
सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग शरीरावर कुठेही चांगले दिसत नाही. ते दूर करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जातो. अगदी पार्लरमध्ये जाऊन ‘मॅनिक्युअर’ आणि ‘पेडीक्युअर’ करून घेतले जाते. टॅनिंग सगळ्यांनाच होत असते, पण काहींना कमी तर काहींना जास्त होते. गोरे आणि सुंदर पाय टॅन झाले तर ते चंद्रावरील डागांसारखे होतील. या टॅनिंगच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी कोरफड जेलमध्ये थोडे बदामाचे तेल मिसळून नंतर ते पायाला लावावे. तासाभरानंतर पाण्याने धुवावे.
हळद पावडरमध्ये टोमॅटोचा लगदा आणि थोडे दूध मिसळावे. नंतर ते आपल्या पायावर लावावे. पाय कोरडे झाल्यानंतर ते पाण्याने धुवावेत. याचा चांगला लाभ होतो. या समस्येवर संत्र्याची सालसुद्धा लाभदायक आहे. या सालीमध्ये दही मिसळून ते पायाला चांगले लावावे. पायाला लावल्यावर ते चांगले वाळू द्यावे. सुकल्यानंतर पाण्याने धुवावे.
बदाम तेलामध्ये मध आणि लिंबाचा रस चांगले मिसळून घ्यावे. नंतर हे मिश्रण आपल्या पायाला लावावे. एक तासानंतर पाण्याने धुवावेत. कच्च्या दुधात तांदळाचे पीठ छान मिसळून घ्यावे. या मिश्रणाने पाय घासून घ्यावेत. नंतर कोमट पाण्याने धुवावेत. पायावर खूपच टॅनिंग होत असेल तर धुण्याच्या सोडा पावडरमध्ये दही चांगले मिसळून ते पायाला लावावे. अर्ध्या तासानंतर मसाज करून नंतर कोमट पाण्याने धुवावेत. हे उपाय लाभदायक आहेत. तरीही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नंतरच उपाय अवलंबणे कधीही चांगले.