
अलीकडेच ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन ओपन नेटवर्क’ मध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्राण्यांपासून तयार केलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असणारा कार्बयुक्त आहारसुद्धा जलद वजन वाढण्याचा धोका संभोवतो. दुसरीकडे, कमी कार्बयुक्त आहार, ज्यात वनस्पती-आधारित प्रथिने असतात, तो जलद वजन वाढू देत नाही.
या संशोधनासाठी 1,23,000 निरोगी लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळून आले की जे लोक वनस्पती-आधारित प्रथिने आणि धान्य खातात त्यांना वजन वाढण्याचा धोका कमी असतो. केवळ कमी कार्बोहायड्रेट आहार घेणे हे वजन टिकवून ठेवण्यास मदत करते, असे नाही तर त्या आहारात काय समाविष्ट आहे, यावरही ते अवलंबून आहे. म्हणून, निरोगी वजन राखण्यासाठी आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश करावा, ज्यामध्ये वनस्पती-आधारित प्रथिने आहेत. हे खाद्यपदार्थ निरोगी वजन राखण्यात मदत करू शकतात.
ब्रोकोलीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, जे निरोगी वजन राखण्यासाठी आवश्यक असतात. हा कमी उष्मांक आणि उच्च फायबरयुक्त खाद्यपदार्थ आहे. फायबरमुळे जास्त खाण्याची समस्या कमी होते. त्यात भरपूर प्रमाणात पोषकद्रव्ये असल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. बाजरीमध्ये सुद्धा मुबलक फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. बाजरी वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. बदामामध्येही अनेक पोषक घटक आढळतात. हे घटक वजन कमी करण्यासोबतच इतरही अनेक फायदे देतात. यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रथिने आढळतात. वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.