मेष राशीसाठी आजचा दिवस सतर्कतेचा
आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : सोमवार, दिनांक ८ जून 2026.
☀️ सूर्याची वृषभातील स्थिती स्थिरता, कुटुंब व भौतिक सुखावर लक्ष केंद्रित करते. 🌙 चंद्र कुंभ राशीत, शततारका नक्षत्र सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटां पर्यंत, त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 🔴 मंगळ: सिंह राशीत पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आहे. 🟢 बुध: मिथुन राशीत मृगशीर्ष आर्द्रा नक्षत्रात आहे. बुध स्वराशीत असल्याने बुद्धी तल्लख व संवादकौशल्य उत्तम आहे. 💎 शुक्र कर्क राशीत पुनर्वसु नक्षत्रात आहे. 🪐 गुरु कर्क राशीत उच्च स्थानी पुनर्वसु नक्षत्रात आहे. 🪐शनि मेष राशीत अश्विनी नक्षत्रात वक्री आहे. 🌌 प्लुटो मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात वक्री आहे.
विशेष ग्रहसंयोग व योग:
🌟 कालाष्टमी भैरवाष्टमी: आज कृष्ण पक्ष अष्टमी तिथी असल्याने कालाष्टमी आहे. भगवान कालभैरवाची उपासना, उपवास व रुद्राभिषेक अत्यंत फलदायी आहे.
🌟 विष्कंभ योग: सकाळी ०९:२७ पर्यंत विष्कंभ योग. या काळात नवे उपक्रम सुरू करणे टाळावे. विशेषतः सकाळी राहुकाळ (०७:२४ ते ०९:०५) व विष्कंभ योगाचा एकत्रित परिणाम लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्णय सकाळी उशिरापर्यंत पुढे ढकलावेत.
🌟 प्रीती योग: सकाळी ०९:२७ नंतर प्रीती योगाचा शुभ प्रारंभ. हा योग प्रेम, सौहार्द, कौटुंबिक संबंध व सामाजिक मेळाव्यांसाठी उत्तम आहे.. दुपारी अभिजित मुहूर्त (११:५९ ते १२:५२) अत्यंत शुभ आहे.
🌟 अमृत चोघडिया: सकाळी ०५:४४ ते ०७:२४ तसेच सायंकाळी ०५:२६ ते ०७:०७ – शुभकार्यांसाठी उत्तम वेळ आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस खूप उत्साही आणि चांगला असेल. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. आज या राशीतील काही लोकांना मुलांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपले कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळेल. आपल्या मनावर ताबा ठेवण्याचे शिका. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची ठरलेली योजना बारगळेल. पण शेवटी जे झाले ते चांगल्यासाठीच झाले, याची जाणीव तुम्हाला होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. हाताखालील कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यामुळे थोडी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. पैशांच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगा. सासरच्या बाजूने शुभ लाभ आहे. वाहन वापरताना विशेष काळजी घ्या. आज तुम्ही घरासाठी वस्तू खरेदी करणार आहात. खास करून गृहोपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल. आज ज्येष्ठांना धार्मिक कामांमध्ये खूप रस राहील.
💼 व्यावसायिकांसाठी : आज तुमच्या कामात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस शुभ आहे. शक्य तितके सामान्य आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.
🏠 महिलांसाठी : आज तुमच्या घरात गृहोपयोगी वस्तूंमध्ये भर पडेल. घरासाठी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. सासरच्या मंडळींकडून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
📚 विद्यार्थ्यांसाठी : कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन विषयात खूप जास्त रस मिळेल. अभ्यासात आपले कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही मन मारून तुमचा वेळ वाया घालवू नका.
🔢 शुभ अंक : ३
🍀 भाग्य टक्केवारी : ७५%
🎨 शुभ रंग : केशरी
🙏 उपाय : आपल्या प्रिय व्यक्तीला सुगंधी वस्तू भेट द्या. यामुळे तुमचे प्रेम जीवन सुरळीत चालेल.
🪔 आजचा सारांश : आजचा दिवस मेष राशीसाठी अनुकूल आहे. सतर्कता बाळगावी लागेल. तुम्हाला आनंदी क्षण आणि नशिबाची साथ मिळेल. कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी काही समस्या असल्या तरी, तुमचा दिवस एकूणच शुभ राहील.
