
अन्नपदार्थाचा स्वाद ओळखणारी जीभ मुळात गुलाबी रंगाची असते. ती तोंडाच्या आतील अवयव असली तरीही तोंड उघडताच ती दिसते. ती स्वच्छ असेल तर व्यक्तीच्या वेहऱ्याच्या सौंदर्यात भरच पडते. म्हणून जिभेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायलाच हवे.
बरेच लोक दररोज दात घासणे ही तोंडाची स्वच्छता मानतात, परंतु ब्रश करण्याबरोबरच जीभ स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे. जीभ रोज स्वच्छ केली पाहिजे, अन्यथा जिभेमध्ये साचलेली घाण पोटात पोहोचते, त्यामुळे व्यक्ती आजारीही पडू शकतो. अनेकदा लोक दात घासतात, पण जीभ साफ करायला विसरतात. जीभ रोज स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक श्वासाच्या दुर्गंधीची तक्रार करतात, जी अन्न दातांमध्ये अडकल्यामुळे येते, परंतु काहीवेळा जीभ स्वच्छ न केल्यामुळेही श्वासाची दुर्गंधी येते.

जीभ रोज स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेक वेळा जीभ साफ केली जात नाही. त्यामुळे अनेकदा तोंडात सुक्ष्म जिवाणू वाढू लागतात, जे थेट पोटात जातात. यामुळे लोकांना आजार होण्याची शक्यता वाढते.
अनेक वेळा जिभेवर पांढरा थर तयार होतो. याचा जिभेवरील स्वाद कळ्यांवरही परिणाम होतो जीभ रोज स्वच्छ केल्याने हा थर निघून जातो, आणि जिभेला गुलाबी रंग येतो. त्यामुळे रोज दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करणे गरजेचे आहे.