वर्सोली समुद्रकिनारा

अलिबागमधील वर्सोली समुद्रकिनारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हा किनारा निर्जन नाही; परंतु अपेक्षित असणारी शांतता प्रदान करतो. पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी हे येथील खास वैशिष्ट्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी असते; परंतु शनिवार-रविवार हे 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे.

या समुद्रकिनाऱ्यावर मोठा नौदलतळ आहे. समुद्रकिनाऱ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुबलक नारळाची झाडे आहेत. या किनाऱ्यावर जलक्रीडा सुविधा असल्याने पर्यटकांना त्यांचा लाभ घेता येतो.
या किनाऱ्यावर जायचे झाल्यास हवाईमार्गे आणि रेल्वेने गेल्यास हे अंतर लांबचे आहे. तथापि तेथे पोहोचण्याचा जलद मार्ग म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया’ वरून फेरी पकडणे हा आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
664 वेळा पाहिलं