
जीवनसत्व ‘बी 12’ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, अंधुक दिसणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा आपल्या मज्जासंस्थेवरही तसेच एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जीवनसत्व ‘बी 12’ च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे देखील घातक ठरू शकते. ‘बी 12’ ची कमतरता दूर करण्यासाठी काही खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात. त्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
अंड्यांमध्ये जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. म्हणून, आपल्या आहारात याचा समावेश केल्याने त्याची कमतरता दूर करण्यात खूप मदत होते. विशेषतः अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ते आढळते. दूध हा जीवनसत्व ‘बी 12’ चा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. काही कंपन्या दुधाला फोर्टिफाइडदेखील करतात, ज्यामुळे त्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे दुधाचा आहारात समावेश करा. डोमा मासा हा ओमेगा-३ फॅटी ॲसिड व जीवनसत्व ‘बी 12’ चाही चांगला स्रोत आहे. म्हणून, आपल्या आहारात या माशाचा समावेश करावा. त्यामुळे जीवनसत्व ‘बी 12’ ची कमतरता दूर होण्यास मदत होते. चिकन आणि टर्की यामध्येही जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. पालक या भाजीमध्ये जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. यासोबतच यामध्ये लोह आणि इतर पोषक घटक देखील आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे पालक या पालेभाजीला स्वतःच्या आहाराचा भाग बनवा