अमेरिकन लष्करात फेरबदल

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने पद सोडण्याचे आणि सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जनरल रँडी जॉर्ज यांची नियुक्ती २०२३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता, मात्र ट्रम्प प्रशासनाने त्यांना मुदतीपूर्वीच निवृत्त होण्यास सांगितले आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पारनेल यांनी पुष्टी केली आहे की, जनरल जॉर्ज एक्केचाळीसावे लष्करप्रमुख म्हणून तात्काळ निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांची प्रभारी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे हेगसेथ यांचे विश्वासू मानले जातात. अधिकृतपणे निवृत्तीचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय तज्ञांच्या मते, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री हेगसेथ यांना लष्कराच्या वरिष्ठ पदावर अशी व्यक्ती हवी आहे, जी त्यांच्या लष्करी धोरणांची बिनशर्त अंमलबजावणी करेल. रँडी जॉर्ज यांनी यापूर्वी जो बायडेन यांच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचे लष्करी सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यामुळे नवीन प्रशासन त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास कचरत असल्याचे समजते. केवळ रँडी जॉर्जच नव्हे, तर जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांसारख्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेने इराणविरुद्ध मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. ट्रम्प यांनी इराणला अश्मयुगाकडे पाठवण्याचा इशारा दिला असताना लष्करी नेतृत्वात झालेला हा फेरबदल अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. युद्धाच्या काळात सहसा लष्करी नेतृत्वात बदल केले जात नाहीतय कारण यामुळे मोहिमेच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,717 वेळा पाहिलं