आंबोलीतील नारायणगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आंबोलीतील ‘कावळेसाद पॉंईंट’ या पर्यटन ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस ‘नारायणगड’ हा किल्ला आहे. पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नारायणगड’ हा किल्ला बांधण्यात आला.नारायणगडाच्या पायथ्याशी ‘गेळे’ गाव असून याच गावातून गडावर जावे लागते. आंबोली घाटाच्या परिसरात असल्यामुळे…

महाडमधील चवदार तळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड~ या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे. हे तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक…

पुण्यातील पाताळेश्वर लेणी
राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन…

हर्णे समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रमणीय असा ‘हर्णे समुद्रकिनारा’ आहे. हे मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. हा विस्तारित खडकाळ किनारा आणि स्वच्छ काळ्या वाळूत विशाल पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा ‘मुरुड हरणाई’ नावाच्या छोट्या शहरात आहे. येथून जवळच दुर्गादेवीचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. या…

अंबागड किल्ला
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे…

मुंबईतील पवई तलाव
पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे…

गोराईतील विश्व विपश्यना पॅगोडा
मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला विश्व विपश्यना पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन…

उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो….

कांचन किल्ला
अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली…

पेंच व्याघ्र प्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा…

सोनुर्लीचे श्री देवी माऊली मंदिर
सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली नावाचे एक गाव आहे. या गावची स्थानिक देवता श्री देवी माऊली फार प्रसिद्ध आहे. देवीच्या कृपाकटाक्षाने फार पूर्वीपासून आत्तापर्यंत लाखो लोक पावन झाले आहेत. या पवित्र स्थानाला ‘दक्षिण कोकणचे पंढरपूर’ असे म्हणतात. देवीचे तेजस्वी रुप मन हरखून नेणारे आहे. दरवर्षी होणारा…

विजयदुर्ग समुद्रकिनारा
‘विजयदुर्ग समुद्रकिनारा’ हा महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा म्हणजे या जिल्ह्याचे वैभव आहे. फेसाळणारा अरबी समुद्र, समोरील आकर्षक सौंदर्य आणि अन्य प्रमुख स्थानांव्यतिरिक्त ‘विजयदुर्ग’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी…

राजदेहेर किल्ला
नाशिक जिल्हयात चाळीसगाव तालुक्याच्या सातमाळ डोंगररांगेत ‘राजदेहेर’ उर्फ़ ‘ढेरी’ हा किल्ला आहे. हा गड दुर्गम आहे. दोन डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी डोंगरांमधील घळीतून जावे लागते. किल्ल्यावर चालून येणारा शत्रू मार्यागच्या टप्प्यात राहील, अशी या गडाची योजना आहे. या पुरातन किल्ल्यावर आजही…

उंबरपाडा गाव
‘उंबरपाडा’ हे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेले एक गाव आहे. नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर ‘करंजाळे’ हे गाव लागते. या गावातून उजव्या हाताला ‘उंबरपाडा’ गावाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पाच किलोमीटर पुढे गेल्यावर आदिवासी निवासी शाळा दिसते. या शाळेकडून काहीसे पुढे जावे म्हणजे उंबरपाडा…

रावणपूजक गाव
काही धार्मिक स्थळे अचंबित करणारी असतात. ती पाहण्यासाठी प्रत्येकाला आवर्जुन जावेसे वाटते. असेच एक स्थळ आहे. भारतातील एका राज्यात रामाची नाही, तर रावणाची पूजा केली जाते. ऐकताच वाटते की, हे राज्य दाक्षिणात्य असावे; परंतु तसे नसून ही पूजा आपल्या महाराष्ट्रातील गावात केली जाते. हे आश्चर्यजनक…

अंजुना समुद्रकिनारा
गोवा म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि निसर्गरम्य बीच ! गोवा राज्य मुंबईच्या दक्षिणेस सुमारे ४०० किमी अंतरावर आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे ! गोवा राज्य पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे. राज्याला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून…

घोडबंदर किल्ला
घोडबंदर गाव, ठाणे, महाराष्ट्र, उल्हास नदीच्या दक्षिणेकडील टेकडीवर. ते पोर्तुगीजांनी बांधले, मराठा साम्राज्याच्या ताब्यात आले आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणाला घोडबंदर असे म्हटले जाते कारण याच ठिकाणी पोर्तुगीज अरबांसोबत घोडे व्यापार करत असत. म्हणून घोडबंदर हे नाव घोडे (घोडे) आणि…

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात ‘ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून २८ किमी. आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. येथून गंगा नदीची प्रमुख उपनदी ‘ज्ञानगंगा’ वाहते. हे अभयारण्य २०५ चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. या…

श्री नृसिंहवाडी
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी होय. कोल्हापूर जिल्ह्यात मिरजेपासून जवळ, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. श्री नृसिंहसरस्वती यांचे येथे १२ वर्षे वास्तव्य होते. नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणारे हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध आहे….

आरंबोल सागरकिनारा
‘आरंबोल’ हे उत्तर गोव्यातील ‘पेडणे’ या प्रशासकीय प्रदेशातील एक पारंपरिक मच्छिमार गाव आहे. हे गाव गोव्याची राजधानी पणजीच्या उत्तरेस 24.6 किमी अंतरावर आहे. या गावातील समुद्रकिनारा फार सुंदर आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तो आकर्षित करतो. गोव्यातील ‘आरंबोल’ समुद्रकिनारा देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्धीस पावलेला आहे. गोव्याच्या…

न्हावीगड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथून दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते. या सह्याद्रीच्या रांगेला ‘सेलबारी’ आणि ‘डोलबारी’ रांग असे म्हणतात. ‘सेलबारी’ रांगेवर ‘न्हावीगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याला ‘रतनगड’ असेदेखील म्हणतात. इसवी सन १४३१ मध्ये अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी मोठे युध्द झाले…

कारंजा-सोहोळ अभयारण्य
वाशीम जिल्ह्यात कारंजा-सोहोळ अभयारण्य हे एक लहानसे अभयारण्य आहे. हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळविटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. वन विभाग या अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे. कारंजा-सोहोळ या अभयारण्यातज गवती माळरान आणि झुडुपी जंगल…

गणपतीपुळेतील श्री गणेश मंदिर
गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत क्षेत्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यावरील श्री गणेश मंदिर पर्यटकांमध्ये सुपरिचित आहे. रत्नागिरी शहरापासून हे २५ किलोमीटर व मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. गणपतीपुळ्याचे हे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीनस्थान आहे. येथे पूर्वी केवड्याचे वन होते. त्याठिकाणी बाळंभटजी भिडे…

लाडघर समुद्रकिनारा
रत्नागिरीतील दापोलीमध्ये लाडघर हा एक रोमांचक असा समुद्रकिनारा आहे. हा किनारा दापोलीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे जलक्रीडा, शांतता अनुभवत मजा लुटता येते. ‘लाडघर’ समुद्रकिनाऱ्याचा उत्तरेकडील भाग खडकाळ आहे, येथील बहुतेक भागात बारीक वाळू आणि दक्षिणेकडील भागात खडबडीत वाळू आहे. लाडघरला भरपूर हॉटेल्स आहेत. त्रितारांकित…

मोरागड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील ‘मोरागड’ आहे, जणू काही हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच आहे. किल्याल्चा गडमाथा म्हणजे एक पठारच आहे. पठारावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर चढताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. दोन-तीन वाड्यांचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. येथे माथ्यावर एक सुंदर बांधीव तलाव आहे. याव्यतिरिक्त…