
स्तुती ऐकणे कोणाला आवडत नाही ! काही लोक प्रशंसा ऐकल्यानंतर अधिक सक्रीय आणि उत्साही वाटतात, परंतु काही लोकांसाठी ही समस्या बनू शकते. यासाठी प्रशंसा आणि खुशामतीतीत फरक समजून घ्यायला हवा.
ॲमस्टरडॅम विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक ब्रुमेलमन म्हणतात, ‘स्तुतीमुळे काही लोकांमध्ये तणाव आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. यात मानसशास्त्र, भावना आणि संस्कृती यासारख्या अनेक कारणांचा समावेश आहे.”
जर आपण संस्कृतीचा विचार केला तर चीन, जपान यांसारख्या अनेक देशांमध्ये स्वतःला सुधारण्याकडे खूप लक्ष दिले जाते. अशा परिस्थितीत, एखाद्या गोष्टीत पारंगत असल्याबद्दल केलेली प्रशंसा त्या लोकांना अस्वस्थ करू शकते. खरे तर, या देशांमध्ये मुलांना लहानपणापासूनच कमतरतांकडे विशेष लक्ष देण्यास शिकविले जाते. त्यांच्या कौशल्यांचा अभिमान बाळगू नये असे शिकवले जाते. कौशल्यापेक्षा व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले जाते. यामुळे माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.

इस्रायलच्या विद्यापीठात याबाबत संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये व्यक्तिमत्वाच्या आधारे स्त्री-पुरुषांचे विचार जाणून घेण्यात आले. त्यानंतर एक गणिताची परीक्षाही झाली. या चाचणीत सिद्ध केले की, प्रशंसा प्रोत्साहन देण्याचे काम करीत नाही, तणाव निर्माण करण्याचे काम करते. याशिवाय, प्रशंसा कोणत्या संदर्भात केली जात आहे, हे देखील खूप महत्वाचे आहे.
इटलीमध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, विनाकारण स्तुती केल्याने विशेषत: महिलांमध्ये चिंता आणि तणावाची पातळी वाढते. अशा परिस्थितीत, स्तुतीमुळे भांडणे आणि राग देखील येऊ शकतो, जे धोकादायक आहे, परंतु त्याच वेळी प्रशंसा आणि खुशामत यातील फरक ओळखणे खूप महत्वाचे आहे.