सीताफळ आरोग्यासाठी लाभदायक

सीताफळ हे एक गोड फळ आहे. ते लोह, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, जीवनसत्व ‘सी’ आणि जीवनसत्व ‘बी’ समृद्ध आहे. हृदय निरोगी ठेवण्यासोबतच ते मधुमेहापासून आराम देण्यासही मदत करते. याशिवाय बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या ॲलर्जीच्या समस्येवरही याचे सेवन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही सीताफळ उपयुक्त आहे.

सीताफळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. ते रक्तवाहिन्यांच्या चांगल्या कार्यास प्रोत्साहन देते. हे फळ नक्कीच गोड आहे, पण त्याचा ग्लायसेमिक भार कमी असल्यामुळे मधुमेहामध्ये याचे सेवन केले जाऊ शकते. यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळते. अशक्तपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांना सीताफळ आराम देण्याचे काम करते. सीताफळ खाल्ल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. गॅस, ॲसिडीटीपासून आराम मिळतो. अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी सीताफळ हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. सीताफळात ल्युटीन असते. सीताफळ डोळ्यांना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते.