त्वचेसाठी बर्फाचा मसाज

त्वचेची काळजी घेताना प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर हवा असतो. चेहऱ्यावरील डाग, निस्तेज त्वचा व्यक्तीला अस्वस्थ करीत असते. अतिनील किरणे, वायू प्रदूषण, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि तणावामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यामुळे कोरड्या त्वचेसह मुरुम, बारीक रेषा आणि सुरकुत्या यांसारख्या समस्या उद्भवतात. निरोगी, चमकणारी आणि मुरुममुक्त त्वचा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बर्फ आहे. तथापि, आजकाल बाजारात त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, आपण खूप पैसे खर्च न करता घरबसल्या या उपायाने आपला चेहरा सुधारू शकता.

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे मुरुमे कमी होऊन बरी होण्यास मदत होते. हा उपाय त्वचेतील जळजळ शांत करतो. त्वचेवरील छिद्रांचा आकार वाढण्यापासून प्रतिबंधित करतो. चेहरा चमकदार बनवितो. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने तुम्हाला कोणत्याही हायलाइटरशिवाय चमकदार त्वचा मिळू शकते. चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने रक्ताभिसरण सुधारते. ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते. शरीरावरील सूज कमी होते.

चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्याने चेहऱ्याची सूज कमी होते. त्यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होते. जळजळ होणे आणि पुरळ उठणे यापासून आराम मिळतो. बर्फ लावणे हा सूर्यप्रकाशाने होणारी त्वचेची आग दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. सूर्यप्रकाशामुळे येणारा लालसरपणा आणि सूज दूर करण्यास मदत करतो. डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतो.






22,778 वेळा पाहिलं