
हा एक केरळचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
उकडलेले बटाटे – २ (चौकोनी तुकडे करून), लहान कांदे (कापलेले) – १०, आले-एक इंचाचा तुकडा, लसूण, भिजवलेली उडीद डाळ (वडे बनविण्यासाठी) – अर्धा कप, हिरव्या मिरच्या – ३, लाल तिखट – १ चमचा, धणे पावडर – २ चमचे, हळद – अर्धा चमचा, मिरी पावडर – अर्धा चमचा, गरम मसाला पावडर – अर्धा चमचा, मोहरी – १ चमचा, नारळाचे दूध – अर्धा कप, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, मीठ – चवीपुरते
कृती :
लहान कढई घेऊन त्यात थोडे तेल तापवा. भिजलेली उडीद डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्या. या वाटणात वडे बनविण्यासाठी मीठ घाला. तेल गरम झाल्यावर एक चमचा मिश्रण तापलेल्या तेलात घाला. चांगले तळून घ्या. वडे एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवा. आता कढईत तीन चमचे तेल तापवा. मोहरी आणि कढीपत्ता घाला. तडतडल्यावर आले, लसूण, कांदे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे परता. आता बटाटे चौकोनी कापून यात घाला. थोडा वेळ परता. त्यावर धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मिरी पावडर घालून एकत्र परता. आता त्यात एक कप पाणी घाला. मीठ घालून ढवळा. भांडे झाकून चांगले शिजवा. पाणी पूर्ण उडून गेले की नारळाचे जाड दूध घाला. थोडे ढवळा. आता त्यात तळलेले वडे घाला. थोडा वेळ उकळू द्या. चांगले मिसळून कोथिंबीर घाला. ‘कुट्टू करी’ तयार आहे. भाताच्या प्रकारांबरोबर ही चांगली लागते.