
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषकतत्वांची गरज असते, अशा परिस्थितीत फक्त शाकाहारी पदार्थांच्या मदतीने शरीरातील सर्व जीवनसत्त्वांची कमतरता दूर करता येते. ताजी फळे, भाज्या खाल्ल्याने आपण तंदुरुस्त रहाल. जाणून घेऊया शाकाहारी खाण्याचे फायदे !
अति मांसाहार करण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. शाकाहारी अन्नाचे सेवन हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ जसे की संपूर्ण धान्य, शेंगदाणे, शेंगा इ. आवश्यक असते. कोलेस्टेरॉलच्या समस्यांवर नियंत्रण ठेवून ते हृदयाचे रक्षण करतात.
अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, ते शाकाहारी आहाराचे पालन करून उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात. शाकाहारी अन्नामध्ये फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण कमी असते, जे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, शाकाहारी पदार्थांमध्ये समाविष्ट असलेली अनेक फळे आणि भाज्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
शाकाहारी असणाऱ्यांना हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो. वास्तविक, दूध, चीज, नट, टोफू, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर ‘व्हेज डाएट’ पाळणे गरजेचे आहे. साधे अन्न वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. चिकन, मासे इत्यादी मांसाहारी पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी शाकाहारी आहार घ्यावा. साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी कडधान्ये आणि हिरव्या भाज्यांचा आहाराचा समावेश करा