चमकदार चेहऱ्यासाठी झेंडूची फुले


चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेले लेप, मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. झेंडूच्या फुलामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंटसारखे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. झेंडूचा ‘फेस पॅक’ कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या.
झेंडूच्या फुलापासून बनवलेला लेप चेहऱ्यावरील डाग देखील दूर करण्यासाठी काम करतो. तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला ‘फेस पॅक’ बनवण्यासाठी झेंडूचे फूल, मध, दुधाची साय आणि हळद लागेल. या सर्व गोष्टी नीट मिसळून हा लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा नीट धुवा. नंतर हा लेप लावा. काही वेळ तसाच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ करा. मुरुमे घालविण्यासाठी तुम्ही हा लेप लावू शकता.
जर तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल तर झेंडूची फुले आणि दही मिसळून लेप तयार करा. यासाठी झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे बारीक करून त्यात दही घालावे. हा लेप काही वेळ चेहऱ्यावर लावा. जेव्हा ते सुकेल तेव्हा ते ओले करा आणि नंतर मसाज करताना चेहरा स्वच्छ करा.