संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे एक्केचाळीस व्या पायी पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे अधिकृत प्रस्थान झाले आहे. ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण देहूनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. उद्या पालखी पुण्यात दाखल होईल….