अकोला विमानतळ धावपट्टी विस्ताराला गती
पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीला गती देणाऱ्या अकोला येथील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. या महत्त्वाकांक्षी विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता पूर्णपणे सुटला आहे. राज्य सरकारने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बावीस पूर्णांक चौवीस हेक्टर खासगी…