अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात
श्री अमरनाथ यात्रेला आज तीन जुलैपासून अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही पारंपरिक मार्गांवरून ही पवित्र यात्रा एकाच वेळी कडक सुरक्षा व्यवस्थेत…