आंब्यांच्या बंदीवर नेपाळचे स्पष्टीकरण
भारतामधून नेपाळमध्ये आयात होणाऱ्या आंब्यांवर नेपाळ सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये आणि सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरल्या होत्या. या बातम्यांमुळे दोन्ही देशांतील फळ व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वनस्पती अलगीकरण आणि कीटकनाशक…