एसटी महामंडळाची भाडेवाढ कायम
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दहा टक्के हंगामी भाडेवाढ लागू केली होती. ही भाडेवाढ आता आणखी एक महिनाभर कायम असेल. ही भाडेवाढ पंधरा जून रोजी संपणार होती. मात्र, आता ती पंधरा जुलै पर्यंत लागू राहणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे….