मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून जगबुडी, वसिष्टी आणि इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महामार्गावर चिखलाचे…