द्रोणागिरी महामार्गावरील नारळी वृक्ष संकटात
उरण आणि द्रोणागिरी नोड या परिसराला जोडणाऱ्या सिडकोच्या सागरी महामार्गावर लावण्यात आलेले हजारो नारळी वृक्ष सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडले आहेत. चालू उन्हाळ्यातील प्रचंड वाढत्या उष्म्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अनेक वृक्षांच्या फांद्या पार करपून गेल्या आहेत, तर काही झाडे संपूर्णपणे सुकली आहेत. सिडको प्रशासनाने…