वृद्ध आई-वडिलांना सांभाळताना

वृद्धत्व हा जीवनाचा निर्विवाद भाग आहे. हे सत्य आहे की जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीराची ताकद कमी होते. याचा परिणाम आई-वडिलांच्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्षमतेवर होतो. त्याचा परिणाम अवलंबित्व वाढण्यातही होतो; वृद्ध पालकांना दैनंदिन कामांसाठी मुलांची मदत घ्यावी लागते. वृद्धापकाळ म्हणजे जेव्हा पालकांना त्यांच्या मुलांची प्रेम आणि आदराने काळजी घेण्याची आवश्यकता असते, असा काळ होय.

वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यामागील भावना ही प्रेम आणि काळजीतून निर्माण होत असली तरी असे करणे नेहमीच सोपे नसते. त्यासाठी कौशल्याची, वेळेची आवश्यकता असते.स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या तुमच्या पालकांची काळजी घेताना जबाबदारी तुमच्यावर येते. तुमचे पालक आरामदायी आहेत याची खात्री करावी लागते.

वृद्ध पालकांची काळजी घेताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घ्याव्यात. वृद्ध पालकांची काळजी घेताना अन्य परिस्थितींचा सामना कसा करता येईल, याचा विचार करावा. आपली आर्थिक स्थिती चांगली असल्यास त्यांच्या सेवेसाठी परीचर किंवा परिचारिका ठेवावी. त्यांच्या दैनंदिन कार्यांमध्ये त्यांना मदत करावी. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. त्यांना काही हवे-नको ते पहावे. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्याशी प्रेमाने वागावे. आदराने वागावे. आई वडिलांनी आपल्या बालपणी जसे आपणास वाढविले त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवावे. कारण अलीकडे वृद्धांच्या समसया चिंताजनक झलेल्या आहेत.






23,333 वेळा पाहिलं