
काकडीची दह्यातील कोशिंबीर बनविण्यास सोपी आणि थंडावा देणारी आहे. याला केरळमध्ये ‘वेल्लरिका खिचडी’ म्हणतात.
साहित्य
काकडी (बारीक तुकडे केलेली) – 2 कप, दही (आंबट नसलेले) – 1 कप, खोवलेला नारळ- अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लहान गोल तुकडे कापलेले) – 3, लहान कांदे – 2, जिरे- अर्धा चमचा, मोहरी- अर्धा चमचा, कढीपत्ता, मीठ.
कृती
खोवलेला नारळ, लहान कांदे आणि जिरे एकत्र वाटून घ्या. आता काकडी, थोडे पाणी, मिरची आणि मीठ घालून शिजवा. भांड्यातील सगळे पाणी संपल्यावर त्यात नारळाचे वाटलेले मिश्रण घालून चांगले मिसळा. मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्ता तडतडवून फोडणी करा व ती यावर घाला. मिश्रण थंड झाल्यावर दही घालून ते चांगले मिसळा.