अनोळखी मुलीशी मैत्री करताना


एखाद्या मेजवानीमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमतच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग चिंता करू नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याविषयी एक हितगुज !
कोणत्याही मुलीसोबत बोलण्यास सुरुवात करण्याआधी पहिल्यांदा तिची आवड जाणून घेणे योग्य ठरेल. मुलींना त्यांच्याबाबतच्या सर्व गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायला हवे, असे वाटत असते. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार करीत आहे, याची जाणीव होते.
प्रत्येक मुलीविषयी मनात चिरंतन आदर व सन्मान असू द्या.
मैत्री हलकीफुलकी आनंदी ठेवण्याचा दृष्टीकोन ठेवा.
कोणत्याही मुलीसोबत बोलण्याची सुरूवात करताना ‘हॅलो’ म्हणा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन ‘हॅलो’ म्हणा. स्वत:चे नाव सांगा आणि मुलीस तिचे नाव विचारा, तुम्हाला हे शक्य नसेल तर काही काम किंवा एखादा प्रश्न विचारून तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वत:ची ओळख गमावू नका. मुलींना खोट्या पद्धतीने वागणारी मुले अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जर खूप पादर्शन मांडलेत, तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात.
मुलींना प्रश्न विचारून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. खोटी प्रशंसा करू नका.
कोणत्याही मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी तिला तुमच्यामध्ये रुची आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचे बोलणे तिला आवडते का याचा अंदाज घ्या.
जेव्हा मुलगी तुमच्यासोबत सुरक्षित असेल तेव्हाच तुमची मैत्री होईल. त्यानंतर तुम्ही तिच्या कुटंबाबाबत जाणून घेऊ शकता; आणि आपल्या कुटुंबाबाबत बोलू शकता.