गोगाबाबा मंदिर

छत्रपती संभाजीनगरमधील गोगा बाबा टेकडी ही एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटेसे गोगाबाबा मंदिर आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील वातावरण नेहमीच शांत व आल्हाददायक असते. या टेकडीवरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य प्रेक्षणीय असते. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर चढण्यासाठी चाळीस ते पन्नास मिनिटे लागतात. श्रावणातील येथील परिसर हिरवागर्द असतो. या टेकडीवर सहलीही आयोजित केल्या जातात. मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबियांसोबत सहज फिरण्यासाठी ही टेकडी उत्तम आहे.

या टेकडीच्या माथ्‌यावरुन शहराचे सुंदर दर्शन्‍ होते. ही टेकडी औरंगाबादच्या लेण्यांच्या अगदी जवळ आहे. टेकडीवर सकाळी किंवा संध्याकाळी जावे. हे ठिकाण औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीवर चढण्यासाठी टेकडीवर सावधगिरी बाळगावी लागते, कारण येथे पाय घसरण्याची भीती असते. मित्रमैत्रिणी तसेच कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी ही टेकडी उत्तम आहे. येथील आकर्षक वास्तू सोनेरी महालाच्या मागे ही टेकडी आहे. गोगा बाबा टेकडीजवळील देवगिरी किल्ला, हनुमान टेकडी , बीबी का मकबरा इत्यादी ठिकाणे आहेत,या टेकडीवर उत्तम छायाचित्रे टिपता येतात.