खजूर शेती
खजुराची लागवड प्रामुख्याने अरब देश, इस्राइल आणि आफ्रिका या देशांमध्ये केली जाते. इराण हा खजूरांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. गेल्या दशकांपासून भारत सरकार खजूर लागवडीसाठी खूप मेहनत घेत असून लागवडीखालील क्षेत्र वाढवत आहे. भारतात राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ ही खजूर पिकवणारी प्रमुख राज्ये…
जहाजबांधणी उद्योग
बंदरांची वाढणारी संख्या आणि त्यातून अर्थव्यवस्थेची होणारी भरभराट, संरक्षण तसेच व्यापाराच्याही दृष्टीने जहाजबांधणी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला हवे. भारताला विस्तीर्ण असा समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. इसवी सन पूर्व 3000 च्या आसपास सिंधू संस्कृती नौका आणि जहाजे वापरण्यासाठी ओळखली जात होती. त्यावेळी हा जहाजबांधणी उद्योग…
पाळणाघर सुरू करताना
‘पाळणाघर’ ही शहरी भागात राहणाऱ्यांची गरज बनली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाळणाघराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नोकरीमुळे मुलांच्या वेळेसोबत आई – वडिलांच्या कामाची वेळ जोडून घेता येत नाही. नोकरदार पालकांसाठी मुलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. गृहिणी आपल्या घरी हा व्यवसाय सहज सुरू करू शकतात….
द्राक्ष शेती
‘द्राक्ष शेती’ हे जगातील अतिशय लोकप्रिय पीक आहे. बहुतेक देशांमध्ये ते व्यावसायिकरित्या घेतले जाते. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. यात ‘ब’ जीवनसत्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. द्राक्ष ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. द्राक्ष कच्ची खाण्यासाठी वापरली जातात. जेली, जाम, मनुका,…
चप्पल उद्योग
‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत…
ड्रायक्लीनिंग व्यवसाय
शहरांमध्ये ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय जोरात सुरू असतो. हा व्यवसाय शहरी आणि निमशहरी भागात व्यवस्थित चालतो, परंतु ग्रामीण भागात जिथे शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कारखाने आहेत, तिथे हा व्यवसाय जोरात चालतो. बरेच लोक आपले कपडे घरी धुतात. तरीही लोकांचा एक वर्ग आहे, जे कपडे धुण्यासाठी बाहेर देतात. शहरीकरणामुळे…
वांग्याची लागवड
‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्बी हंगामात व अगदी उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात अंदाजे 28,…
कागद उद्योग
भारतातील कागद उद्योग हा एक कृषी-आधारित उद्योग आहे. जागतिक स्तरावर ‘भारतीय कागद उद्योग’ उच्च स्थानावर आहे. देशातील पहिली कागद गिरणी इसवी सन 1812 मध्ये सेरामपूर-बंगाल येथे स्थापन झाली; परंतु कागदाच्या मागणीअभावी ती अयशस्वी झाली. सन 1870 मध्ये कोलकाता जवळील ‘बालीगंज’ येथे हा उपक्रम पुन्हा सुरू…
खासगी बँकांमधील नोकरी
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात बँकिंग क्षेत्राला खूप महत्त्व आले आहे. खासगी बँकांनी बँकिंग क्षेत्रात स्वत:चा लक्षणीय ठसा उमटवला आहे. या बँकांमध्ये विविध प्रकारच्या अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात. खासगी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी योग्य पात्रता असणे आवश्यक असते. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या मुलामुलींच्या मनात या नोकरीचे आकर्षण…
मेथीची लागवड
महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते….
बर्फ बनविण्याचा उद्योग
उन्हाळा आला की थंडगार पाणी, सरबत, आइस्क्रिम, बर्फाचा गोळा यांची मागणी वाढते. या सर्वांना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ आवश्यक असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणातील बर्फाची मागणी बर्फ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतून पूर्ण केली जाते. चला तर मग, आज माहिती घेऊया बर्फ बनविण्याच्या उद्योगाबद्दल. बर्फाचा कारखाना सुरू…
सिमेंट उद्योग
आधुनिकीकरणामुळे सिमेंट क्राँक्रीटच्या इमारतींची जंगले बांधली जात आहेत. सिमेंट उद्योगातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागणी जास्त असल्याने हा कायमच तेजीत असणारा उद्योग आहे. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील मातीच्या साध्या टाइलच्या घरांची जागा सिमेंट काँक्रीटच्या घरांनी घेतली आहे. बहुमजली इमारती, अपार्टमेंट, बंगले, रो-हाऊस, उड्डाणपूल,…
चहा व्यवसाय
‘चहा फ्रँचायझी’ हा उद्योग व्यापक होऊ लागला आहे. अनेक ब्रँड्स आणि कंपन्यांनी उद्योगात स्वतःची ओळख करून दिली आहे. त्यामुळे या व्यवसायात चांगला फायदा मिळतो. उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक कुटुंबाला व प्रत्येक व्यक्तीला हे पेय आवडते. ते भारतातच नव्हे, तर जगभरात सर्वाधिक सेवन…
वालाची लागवड
वालाची लागवड ताटी पद्धतीने करावी लागते. वेल अंदाजे ५ मीटरपर्यंत वाढते. वेलीला आधार दिल्यास आणि वर्षभर वेलींची छाटणी करत राहिल्यास उत्पादन चांगले मिळते. वालाची लागवड केल्यापासून वेल ताटीवर चढेपर्यंत अंदाजे २ महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे मधल्या काळात पालेभाज्यांचे मिश्रपीक घेण्याचा विचार शेतकरी करू शकतात. पश्चिम…
घरघूती डब्बा सेवा व्यवसाय
देशभरात नोकरीच्या संधी विकसित होत आहेत आणि लोक त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळवण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये जात आहेत. रोजगाराच्या वाढत्या संधी आणि नवीन शैक्षणिक संस्थांमुळे मोठ्या शहरांना लोकसंख्येच्या मोठ्या ओघाचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही…
भेंडीची शेती
महाराष्ट्रात भेंडीची लागवड अनेक जिल्ह्यांत केली जाते. भेंडीला ग्राहकांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे उत्पादन वर्षभर घेता येते. भेंडीमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. भेंडीचे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी शेतजमीन आवश्यक असते. किमान…
खिळे बनवण्याचा उद्योग
‘खिळा’ ही वस्तू माहिती नसणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर तरी शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात किमान १ खिळा तरी नक्कीच असतो. खिळ्याला असलेली मागणी ही सतत वाढत जाणारी आहे. लघुउद्योगातून महिन्याला किमान २४ लाख खिळे तयार होतात. खिळे बनवण्याची प्रक्रिया ही यंत्रांवर आधारित आहे. त्यामुळे…
गादी बनविण्याचा व्यवसाय
अल्प उत्पन्न गट ते श्रीमंत यांच्याकडे आढळणारी एक सामायिक गोष्ट म्हणजे ‘गादी’! गादीचे प्रकार वेगवेगळे असतील, पण किमान एक गादी सद्यःस्थितीत तरी आपल्याला प्रत्येकाच्या घरात आढळते. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरात कापूस पिंजून देऊन आपल्या घरासमोरच बसून गादी शिवून देणारा व्यक्ती यायचा. आता वाढत्या शहरीकरणात एखाद्या गावात…
लिची लागवड
उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत…
घासणी उद्योग
भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी घासणी म्हणजेच स्क्रबरचा वापर सगळीकडे केला जातो. जेव्हा घासणीचा शोध लागला नव्हता, तेव्हा नारळाच्या शेंडीचा वापर घासणीसारखा केला जायचा. घासणीमुळे तेलकट – तूपकट झालेली भांडी लख्खं होतात. चकाकू लागतात. घासणी उद्योगामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा दडलेला आहे. हा लघुउद्योग घरच्या घरी…
दंतचिकित्सा व्यवसाय
दंतचिकित्सा हा एक स्वतंत्र व्यवसाय असून आरोग्य सेवांचा एक महत्त्वाचा विभाग आहे. दंतचिकित्सा व्यवसायासाठी तोंडाची रचना, दातांची उत्पत्ती, विकास आणि कार्यप्रणाली आणि इतर अवयव, औषधे, शस्त्रक्रिया आणि यांत्रिक उपचारांचे योग्य ज्ञान आवश्यक आहे. विकसनशील देशांमध्ये दंत व्यवसाय करणे हे अधिकाधिक सामान्य होत चालले आहे. परिणामी…
सुरण लागवड
‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते. हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली…
रबर शिक्का निर्मिती उद्योग
कोणत्याही कार्यालयीन कामकाजात शिक्क्याला महत्त्व असते. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की, “या पत्रावर स्टॅम्पची गरज आहे” आणि त्या पत्रावर काम मिळाला की ते कामही चटकन होऊन जाते. तर अशा या ‘रबर शिक्का’ उद्योगाबद्दल जाणून घेऊ. बाजारात दोन प्रकारच्या रबर शिक्क्यांना मागणी आहे. पहिला प्रकार…
आयुर्वेदिक औषधांचे दुकान
जगाला पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व समजू लागलं आहे. झटपट औषधांपेक्षा मूळातून आजार बऱ्या करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांची जास्त ओढ आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयुर्वेदिक दवाखाना, रुग्णालय यांच्या आसपासच्या परिसरात किंवा एखाद्या वैद्याच्या दवाखान्यामध्येही थोडी जागा घेऊन आपण औषधालय सुरू…
केवडा लागवड
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…