अयोध्येत मंदिर बांधकामाला वेग – योगी आदित्यनाथ यांनी घेतला आढावा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पूजा–अर्चना करून आपल्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी संकटमोचन हनुमानगढी येथे विशेष प्रार्थना केली आणि भक्तांसाठी शांतता, कल्याण आणि समृद्धीची कामना व्यक्त केली. पूजा पार पडल्यानंतर त्यांनी थेट रामलला मंदिर भेटीसाठी प्रयाण केले. रामलला मंदिरात पोहोचल्यावर…
भारत–इस्राईल आर्थिक सहकार्यास नवी दिशा
भारत–इस्राईल आर्थिक व व्यापारी सहकार्याला नवीन गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इस्राईलचा त्रिदिवसीय दौरा सुरू केला आहे. या भेटीदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांतील भागीदारी मजबूत करण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा होणार आहेत. द्विपक्षीय सहकार्यास अधिक बळकटी देण्याचा उद्देश या…
उत्तराखंडमध्ये अस्वलांच्या हल्ल्यांमध्ये वाढ – स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशात अस्वलांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या घटनांमुळे गढवाल विभागातील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक लोक सूर्यास्तानंतर घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळत आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या पंचवीस वर्षांत अस्वलांनी केलेल्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०००…
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक – नागरिकांचे स्थलांतर
इंडोनेशियातील जावा बेटावरील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट सेमेरू ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे आकाशात साडेपाच किलोमीटर उंचीपर्यंत राखेचे आणि गरम ढगांचे प्रचंड स्तर पसरले. ज्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्वरित सतर्कता दाखवत नागरिकांच्या स्थलांतरणाला सुरुवात केली. हा उद्रेक जावा प्रांतात…
नितीश कुमार यांचा शपथविधी – दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पाटणा येथील राजभवनात झालेल्या या महत्त्वाच्या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक मोठे नेते उपस्थित…
बंगळूरुच्या हवेची गुणवत्ता घसरली – नागरिक चिंताग्रस्त
बंगळूरुच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक घसरला असून तो आता खराब श्रेणीत नोंदवला गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही चिंताजनक स्थिती आणि प्रदूषणाची पातळी पाहून अनेक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बंगळूरु शहराची हवेची गुणवत्ता एकशे अठ्ठ्याहत्तरच्या वर पोहोचली होती. हा निर्देशांक संवेदनशील गटांसाठी…
चीनकडून जपानी खाद्यपदार्थांच्या आयातीवर पुन्हा बंदी
आशियातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि जपानमधील वाढत्या राजकीय तणावामध्ये चीनने जपानी सी-फूडच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय जपानला कळवला आहे. याआधी २०२३ मध्ये, जपानने फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पातून प्रक्रिया केलेले दूषित पाणी समुद्रात सोडण्यास सुरुवात केली होती. या निर्णयाला चीनने तीव्र विरोध केला…
अतिवृष्टीमुळे चेन्नईमध्ये शाळांना सुट्टी
तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि त्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये ईशान्य मान्सूनमुळे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थिती आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलत चेन्नई शहरासह अनेक जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, हे या निर्णयाचे मुख्य…
चीन जपान संबंध तणावपूर्ण – युद्धाची शक्यता वाढली
सध्या जगातील एक महत्त्वाचा भू-राजकीय तणाव चीन आणि जपानच्या दरम्यान वाढत आहे. जागतिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या दोन सामर्थ्यशाली देशांमध्ये कोणत्याही क्षणी लष्करी संघर्ष सुरू होऊ शकतो. जपानच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, जर चीनने तैवानवर हल्ला केला तर जपान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय…
लवकरच नव्या बदलांसह आधारकार्ड होणार अधिक सुरक्षित
भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आधारकार्ड हे ओळखीचा पुरावा आहे. आज प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड शिवाय कोणतच काम होत नाही. आधारकार्ड एवढा महत्त्वाचा दस्तावेज असताना त्याच्या गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्डच्या सुरक्षेच्या आणि गैरवापर रोखण्याच्या दृष्टीने केवळ फोटो आणि क्यूआर…
रशियाशी वाढत्या व्यापारामुळे भारत आणि चीनवर निर्बंधांचे संकेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनविरोधात कडक आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. त्यांनी सांगितले की, रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर अमेरिका कठोर भूमिका घेणार असून त्यात भारत आणि चीन या दोन महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे. त्यांच्या…
पूर्वलक्ष्यी पर्यावरण मंजुरी मान्य – पर्यावरण संतुलनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत
देशातील मोठ्या प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा बदलला आहे. यापूर्वी न्यायालयाने ठरवले होते की कोणत्याही प्रकल्पाला मागाहून पर्यावरणीय मंजुरी देता येणार नाही. मात्र, आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल मागे घेतला असून, केंद्र सरकारला पुन्हा एकदा पूर्वीच्या तारखांपासून लागू होणारी मंजुरी…
कर्नाटकातील प्राणीसंग्रहालयात वन्यजीव संकट – चौकशीचे आदेश
कर्नाटकातील बेळगावी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयात केवळ काही दिवसांत एकतीस काळविट संशयास्पदरित्या दगावल्यामुळे एक गंभीर संकट उभे राहिले आहे. यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या एकूण अडतीस काळविटांपैकी केवळ सात काळवीट शिल्लक राहिले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत झालेल्या या दुर्घटनेमुळे प्राणीसंग्रहालय प्रशासन आणि वन्यजीव…
जपानमध्ये ज्वालामुखीचा सर्वात मोठा उद्रेक – हवाई वाहतूक विस्कळीत
जपानच्या नैऋत्येकडील क्यूशू बेटावर असलेल्या कागोशिमा प्रांतातील सकुराजिमा ज्वालामुखीचा १६ नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास भीषण उद्रेक झाला. जपानमध्ये गेल्या चाळीस वर्षांतील हा सर्वात मोठा स्फोटक उद्रेक मानला जात आहे. या उद्रेकामुळे राख आणि धुराचे प्रचंड लोट वातावरणात सुमारे साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत उसळले, ज्यामुळे स्थानिक हवाई वाहतूक…
आरक्षण मर्यादा उल्लंघनावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यास निवडणुकांवर स्थगिती आणण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. यासंबंधीची सुनावणी आता १९ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य…
चीनचे आणखी तीन अंतराळवीर अंतराळात अडकले
चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर असलेले आणखी तीन अंतराळवीर सध्या अंतराळात अडकले आहेत. त्यांच्यापूर्वी अडकलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांची यशस्वी सुटका झाल्यानंतर लगेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या अंतराळ कार्यक्रमात काही आठवड्यांपूर्वी एक मोठी अडचण निर्माण झाली होती. शेनझोऊ – वीस मोहिमेचे तीन अंतराळवीर त्यांच्या मूळ रिटर्न…
पारदर्शक निवडणुकांसाठी आसाम सज्ज – मतदार याद्यांची विशेष तपासणी सुरू
आसाममधील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने विशेष फेरतपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश पाठवून ही प्रक्रिया काटेकोरपणे आणि निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या विशेष फेरतपासणीमुळे…
ऊर्जा व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील करारांसाठी भारत रशियाची मोठी तयारी
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे रशियाची राजधानी मॉस्को येथे त्यांच्या समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यासाठी पोहोचले. भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आगामी वार्षिक शिखर परिषदेच्या काही आठवडे आधीच झालेली ही भेट दोन्ही देशांतील रणनीतिक संवाद मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण…
मोदी आणि शाहांचा बिहार दौरा – शपथविधी सोहळ्याकडे देशभराचे लक्ष
बिहारमध्ये सत्ताबदलाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, एनडीएच्या नव्या सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबर रोजी पटना येथील गांधी मैदानात होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या राम मंदिराचे ध्वजारोहण होणार
उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथील राम मंदिरावर रामध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा सोहळा हा २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. या ऐतिहासिक घटनेसाठी उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास मोठ्या स्तरावर तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या मुख्य शिखरावर किंवा आवारात हा पवित्र ध्वज फडकावला…
तैवानवरुन चीनसोबत झालेला वाद शांत करण्याचा जपानचा प्रयत्न
जपान आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तणावपूर्ण झाले आहेत. या वाढत्या वादावर पडदा टाकून संबंध पूर्ववत करण्यासाठी जपानने एक वरिष्ठ मुत्सद्दी बीजिंगला पाठवला आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आशिया आणि ओशनिया विभागाचे महासंचालक मासाकी कानाई हे चीनमधील त्यांचे समकक्ष लिऊ जिनसॉन्ग यांची भेट…
पंधरा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला सरकारची परवानगी
देशातील साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. केंद्र सरकारने चालू ऊस गळीत हंगामासाठी देशातील साखर कारखान्यांना पंधरा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने देशभरातील साखर कारखान्यांसाठी हा निर्यात कोटा निश्चित केला…
धोकादायक वाळूमुळे न्यूझीलंडमधल्या शाळा बंद
न्यूझीलंडमधील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीत खेळण्याच्या वाळूच्या अनेक ब्रँड्समध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारे ॲस्बेस्टॉस हे धोकादायक खनिज आढळल्यामुळे देशभरातील अनेक शाळा आणि बालवाडी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली असून, यामुळे…
भारत कोणत्याही युद्धासाठी सज्ज – जनरल उपेंद्र द्विवेदींच्या निर्णायक शब्दांवर देशाचा विश्वास
भारताचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग’मध्ये स्पष्ट सांगितले की, भारत कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज आहे. त्यांनी म्हटले की, युद्ध चार महिने चालो किंवा चार वर्षे, भारतीय लष्कर नेहमीच तयारीत राहील. ते म्हणाले की, “देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही मर्यादा नसते; सैनिक नेहमीच…
सौदी अरबच्या युवराजांचा तब्बल सात वर्षांनंतर अमेरिकेत दौरा
सौदी अरबचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा अमेरिकेच्या अधिकृत भेटीसाठी रवाना होत आहेत. या दौर्याबाबत व्हाईट हाऊसकडून औपचारिक घोषणा करण्यात आली असून, दोन्ही देशांतील संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. जागतिक स्तरावरील राजकीय व आर्थिक घडामोडींच्या…